पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धनंजय मुंडेंच्या पुढाकारातून परळीतील हजारो बेरोजगारांना मिळाले काम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत आधार महोत्सवांतर्गत भव्यदिव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला

माजी उपमख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाढिवसानिमित्त आयोजित आधार महोत्सवाच्या माध्यमातून परळी मतदार संघातील बेरोजारांच्या हाती काम उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. परळी मतदार संघातील १ हजार ५०८ बेरोजगार  युवक-युवतींची थेट नोकरीसाठी निवड करण्यात आली.

धनंजय मुंडे यांच्या हस्ते या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन  झाले. वर्षातून दोन वेळा परळीत अशाप्रकारचा नोकरी महामेळावा घेतला जाईल, असे आश्वासनही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत आधार महोत्सवांतर्गत परळी मतदार संघातील बेरोजगार युवक-युवतींना नोकरी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने भव्यदिव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सुमारे पाच हजार बेरोजगारांची नोंदणी झाली होती. अतिशय शिस्तबद्ध व सुनियोजित व्यवस्थेत राज्यातील विविध तीस कंपन्यांनी बेरोजगारांच्या कागदपत्रांची पडताळणी, मुलाखती आणि नोकरी आदेशाची प्रक्रिया पूर्ण केली. 

'पक्ष सोडतोय हे पवारसाहेबांना सांगण्याचं धाडस झालं नाही'

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की,  परळी मतदारसंघात गेल्या पाच वर्षांच्या काळात एकही नवीन उद्योग आलेला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याच्या सरकारमध्ये महत्त्वाची   मंत्रिपदे आपल्या भागाला मिळूनही या भागातील युवा बांधवांच्या हाताला रोजगार उपलब्ध होईल, असा कोणताही उद्योग किंवा प्रकल्प दुर्देवाने आलेला नाही. आपण यादृष्टीने सातत्याने प्रयत्नशील आहोत. सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या भागात निर्माण करून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परळी परिसरात नवीन उद्योग यावे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून अनेक रोजगार उपलब्ध होणार आहेत. अशाच प्रकारचा नोकरी महोत्सव वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले. 

दुष्काळ : बीडमधील शेतकरी संकटात, पीक कापणीला येण्यापूर्वीच मोडणी