पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या शौर्याची दखल गिनीज बुकने घ्यावी, धनंजय मुंडेंचा टोला

धनंजय मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला का सामोरे जात नाहीत, असा प्रश्न विरोधकांकडून गेली पाच वर्षे कायम विचारला जात असतानाच शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. मात्र मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली नाहीत. यावरुन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदींना टोला लगावला आहे. मोदींचे याबद्दल अभिनंदन करत त्यांच्या या शौर्याची दखल गिनीज बुकने आवर्जून घ्यावी, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली.

EVM मध्ये फेरफार केला जाऊ शकत नाही, अजित पवारांचे शरद पवारांपेक्षा वेगळे मत

वाढदिवशी आनंद परांजपे यांनी 'चौकीदार चोर है' केक कापला

धनंजय मुंडे यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेनंतर टि्वट करत मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ५ वर्षे तोंडात मूग गिळून बसलेल्या पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले. विशेष म्हणजे पत्रकारांच्या एकही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या शौर्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे हार्दिक अभिनंदन! गिनीज बुक रेकॉर्ड वाल्यांनी आवर्जून नोंद घ्यावी.

तत्पूर्वी, मोदींनी संपूर्ण पत्रकार परिषदेत अवघे १२ मिनिटे संवाद साधला.  जनतेने नवे सरकार कुणाचे असावे, हे ठरवले आहे. नवे सरकार लवकरात लवकर कार्यभार स्वीकारेल, असे ते म्हणाले. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना अमित शहा उत्तर देतील असे सांगत मौन राहणेच पसंत केले.

शेतकरी आंदोलनातून मनसेचा ग्रामीण भागात पोहोचण्याचा प्रयत्न

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader dhananjay munde slams on pm modis pc says Guinness book of world record should recognize modis performance