पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतून उगम पावलेलं ग्रहण कधी सुटणार?, धनंजय मुंडेंचा खोचक सवाल

धनंजय मुंडे

या दशकातील शेवटचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी देशभरात नागरिकांमध्ये उत्साह आहे. भारतात केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही नक्कीच पर्वणी होती. दरम्यान, राजकारण्यांनी याचा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापर केल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सूर्यग्रहणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आर्थिक डबघाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सीएए, एनआरसीसाठी सुरु असलेला हिंसाचार, कायदा सुव्यवस्था पाहता, दिल्लीतील उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंडे यांनी टि्वट करुन मोदींना हा टोला लगावला आहे. यात मोदी हे ग्रहण पाहतानाचा फोटो ही त्यांनी शेअर केला आहे. 

सावित्रीबाई फुलेंनी सोडला काँग्रेसचा हात; स्वत:चा पक्ष स्थापन करणार

सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. दरम्यान, टि्वटर युजर्संनी मुंडे यांच्या या टि्वटचा समाचार घेतला. अनेकांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

RSSचे PM भारतमातेशी खोटं बोलत आहेत, राहुल गांधींचा टोला

दरम्यान, राज्याच्या अनेक ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासच 'ग्रहण' लागले आहे. राज्यात पुढचे दोन दिवस वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.