पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर भाजपमधला 'भा' पण उरला नसता, धनंजय मुंडे यांचा घणाघात

धनंजय मुंडे

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा पर्दाफाश केला म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. आघाडी सरकारने असे राजकारण केले असते तर आज भाजपचा 'भा' पण शिल्लक राहिला नसता, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कृतीचा धिक्कार केला आहे. 

राज ठाकरेंच्या चौकशीबाबत काहीच वाटत नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सोमवारी पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरू झाला. त्यानंतर बाळानगर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.

मराठवाडा ही भूमी संतांची आहे, महापुरुषांची आहे. आमच्या महापुरुषांचा अपमान इथे सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये, शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देवू मोदींना साथ, अशी घोषणा दिली होती. मात्र, आज पाच वर्षांनंतर जेव्हा मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा साधा उल्लेखही नाही. ना त्यांच्या स्मारकासाठी वीट रचली गेली आहे. हा आमच्या महाराजांचा अपमान आहे, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

कोहिनूर इमारत प्रकरणः उन्मेष जोशी म्हणतात, ईडीला सहकार्य करु

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडण्याचे काम भाजप, शिवसेना करते आहे. इतके नीच राजकारण कधी महाराष्ट्रात घडले नव्हते. भ्रष्टाचाराचे आरोप असताना बबनराव पाचपुते, विजय गावित यांना भाजपत घेतले. भ्रष्टाचार मुक्त भारत घोषणा देणाऱ्यांना हे कसं पचते ? देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिलेच पाहिजे, असे आव्हान त्यांनी दिले.