पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची निर्घृण हत्या

महाराष्ट्रात एका महिलेचा खून

पलूस तालुक्यातील खटाव येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील  (अतिरिक्त जिल्हाधिकारी)  यांचे ते भाऊ होते.  गावातील शेतातून घरी परतत असताना  अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांवर ग्रेनेडचा हल्ला

या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांना सांगलीच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  आनंदराव पाटील हे सकाळी शेतात गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन ते घराकडे परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.  या हल्ल्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी आहे का? अशी चर्चा रंगत आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

'अखेरच्या श्वासापर्यंत उपलब्ध कायदेशीर पर्याय वापरण्याचा अधिकार'