पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आमचे सरकार आल्यावर संपूर्ण कर्जमाफी करु'

अजित पवार

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून सरकारला रब्बी आणि खरीप पिकातील फरक माहिती नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पैठण येथील शिवस्वराज्य यात्रे दरम्यान अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी आमचे सरकार आल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी करु असे आश्वासन त्यांनी दिले. सरकार तरुणांची माथी भडकावत असल्याचा आरोप करत सत्ता द्या, ७५ टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याचा कायदा करु, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

कोहिनूर इमारत प्रकरणः उन्मेष जोशी म्हणतात, ईडीला सहकार्य करु

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमधील पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबादच्या पैठण येथून या यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अमोल कोल्हे उपस्थित आहे. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झाली आहे. 

उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये ढगफूटी; ३२ नागरिकांचा मृत्यू