परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. अजूनही बहुतांश भागांमध्ये पंचनामे झालेले नाहीत. दरम्यान, एकीकडे भाजप-शिवसेनेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रत्यक्षात बांधावर पोहोचले आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यासाठी शरद पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत.
'भाजप-शिवसेनेच्या सत्तानाट्यामध्ये काँग्रेसने पडू नये'
परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना भेट दिली. पावसात पिकांची नासाडी झालेल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा जाणून घेतल्या. pic.twitter.com/T33aU9p5jp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 1, 2019
यावेळी पवार यांनी इगतपुरीसह विविध गावांना भेट देऊन नुकसानीचा अंदाज घेतला. शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा येत्या रविवारी (दि.३) दौरा करणार आहेत. तर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.