पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पवारांना शेतकऱ्यांची चिंता; विदर्भातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल भागातील नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन पवारांनी पिकांची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. विशेष म्हणजे शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन बच्चू कडू आक्रमक; पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूरमधील शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबिन, कापूस आणि संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीसाठी लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पवारांची भेट घेतली आणि त्यांना समस्या सांगितल्या. 

... यापुढे जपून बोला, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले

राज्यामध्ये सरकार स्थापनेचा पेच सुटत नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. सरकार स्थापन न झाल्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सरकार स्थापन न झाल्यामुळे मदत कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, राज्यातील सर्व पक्षाचे नेते सत्ता स्थापनेसाठी मुंबईत प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दौरे करत आहेत.  

राफेल विमान खरेदी : फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या