पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा पक्ष सोडण्याच्या तयारीत

राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमधील पाच उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये नमिता मुंदडा यांना देखील उमेदवारी घोषीत केली होती. मात्र आता नमिता मुंदडा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव, चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो गायब झाला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे त्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दहशतवादाविरोधात ट्रम्प आमच्यासोबत, मोदींचा पाकला सूचक इशारा

नमिता मुंदडा यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांनी गेली २५ वर्षे लोकांच्या हितासाठी पूर्ण आयुष्य दिले. मतदारसंघातील प्रत्येकाशी कौटुंबिक नाते निर्माण करून थेट संपर्क ठेवला. पण मार्च २०१२ मध्ये ताई आपल्यामधून अचानक निघून गेल्या. मागील ७ वर्षांपासून आमच्या संपूर्ण कुटुंबाने कुठलेही पद नसताना लोकांच्या हितासाठी काम सुरू ठेवले. हेच नाते आता मला पुढे कायम ठेवून, मतदारसंघाचा विकास करायचा आहे. येत्या विधानसभेसाठी मी उभी राहणार आहे. आपला आशिर्वाद असावा, ही नम्र विनंती.' 

२६ सप्टेंबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर; युतीचा तिढा सोडवणार?

राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी निवडणुकीपूर्वीच ही पोस्ट केल्यामुळे त्या पक्ष सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा या दिवंगत विमल मुंदडा यांच्या सुनबाई आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधी ही पटले नाही. 

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे निधन