पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर मी तुम्हाला पुन्हा दिसणार नाही; कार्यकर्त्याची भावनिक पोस्ट

अजित पवार आणि बाबू आवारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्यापासून अजित पवार हे 'गायब' झाले होते. त्याचा मोबाईल बंद होता. ते कोणाच्या संपर्कात नव्हते तसंच ते कुठे आहेत याबाबत देखील कोणाला काहीच माहिती नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चिंतेत आले होते. अशातच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने फेसबुकवर केलेली भावनिक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे.

युतीही होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीहीः उद्धव ठाकरे

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबू आवारी याने अजित पवार यांच्यासोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला. या फोटोवर त्याने असे लिहिले आहे की, 'आदरणीय दादा, तुम्ही जर आम्हाला ६.०० वाजता दिसले नाहीत, तर मी तुम्हाला पुन्हा दिसणार नाही.. दादा तुमच्यासाठी काही पण..' बाबू आवारीच्या या भावनिक पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल; पवार कुटुंबियांमध्ये चर्चा सुरु

दरम्यान, राजीनाम्यानंतर अजित पवार तब्बत १९ तासांनंतर समोर आले आहेत. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सध्या सिल्व्हर ओकवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्यामध्ये बैठक सुरु आहे. 

नोकरी गेल्याने इंजिनिअरने कुटुंबियांना संपवून केली आत्महत्या