पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून दोन ग्रामस्थांची हत्या

पिंपरीत तरुणाची हत्या

नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह आजपासून सुरु झाला आहे. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी पोलिस पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे ही घटना घडली आहे. मासु पुंगाटी (पोलीस पाटील) व ऋषी मेश्राम (राष्ट्रवादी कार्यकर्ता) अशी हत्या केलेल्यांची नाव आहेत. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांनी कमलापूर येथे हत्ती कॅम्पमध्ये साहित्यांची आणि शेडची तोडफोड केली आहे.

 'पंकजा मुंडे काय अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात'

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहिला. मात्र त्यानंतरही शासन आणि प्रशासनाने येथे उत्खननाचे काम सुरू केले. या उत्खननाला मासू पुंगाटी आणि ऋषी मेश्राम यांनी समर्थन दिले. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी झाडे रस्त्यावर टाकून भामरागड-आलापल्ली मार्गही बंद केला आहे.

'..ही तर महाराष्ट्राशी गद्दारी',हेगडेंच्या दाव्यानंतर राऊत संतापले

आजपासून नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु झाला आहे. हा सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून विविध ठिकाणी पत्रके आणि बॅनर्स बांधून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतीला न जुमानता अनेक गावातील आदिवासी नागरिकांनी एकत्र येत नक्षली बॅनर आणि पत्रकांची होळी करून 'नक्षलवादी मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या होत्या. 

हैदराबाद बलात्कार प्रकरण : 'निर्भया'च्या आईची विनंती