पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीः पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशय, नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत एका व्यक्तीची हत्या केली आहे.(संग्रहि

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत एका व्यक्तीची हत्या केली आहे. ही घटना रविवारी सांयकाळी इटापल्ली तालुक्यातील बंडे गावात घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव सुधीर सरकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी प्रथम सुधीर सरकारचे अपहरण केले होते. रविवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह गावाजवळील जंगलात आढळून आला. मागील दोन दिवसात घडलेली ही दुसरी घटना आहे. 

शनिवारी गडचिरोलीतील मारधार गावातून एका लग्न समारंभातून एकाचे अपहरण केले होते. त्याचाही मृतदेह नंतर गावाजवळ आढळून आला होता. जानेवारी महिन्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे सहा जणांना ते पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या संशयावरुन त्यांची हत्या केली होती.

दरम्यान, राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाचे १५ जवान शहीद झाले होते.