राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या मनाचे असल्याचे म्हटले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या परिस्थितीत पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्याकडे भाजपसोबत येण्यासंदर्भात विचारणा केली होती. भाजपसोबत आल्यास सुप्रिया सुळे यांना कॅबिनेटची ऑफर ही देऊ केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असलेल्या सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
Nationalist Congress Party leader Supriya Sule on Ajit Pawar: He had not joined BJP. This is internal matter of our party and family. He will always remain my elder brother and senior leader of the party. https://t.co/VXX3MzV7IX pic.twitter.com/jdamrW8L8x
— ANI (@ANI) December 3, 2019
'बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प पुढे ढकलता येईल का? याचा विचार सुरु'
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही भाजपसोबत यावे असा प्रस्ताव मांडला हा पंतप्रधानांचा मोठेपणा आहे. मी त्यांची आभारी आहे. पणमोदींना जे अपेक्षित होते ते होऊ शकले नाही, अशा शब्दांत त्यांनी सत्तासंर्षात भाजपसोबत जाण्याचा विचारही केला नसल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी अजित पवार यांचीही पाठराखण केली. अजित पवारांनी कधीच भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. अजित पवारांच्या निर्णय हा पक्ष आणि कुटुंबियातील अंतर्गत मुद्दा होता. ते माझे लहान भाऊ आणि पक्षातील ज्येष्ठ नेते असून ते नेहमीच आमच्यासोबत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास, बंडखोरी माझ्या रक्तात नाही'
राज्यातील सत्तासंघर्ष टोकाला पोहचला असताना शरद पवार यांनी दिल्ली दरबारी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. राज्यातील अवकाळी पावसाने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्यासंदर्भात ही भेट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र या भेटीत राज्यातील राजकीय विषयावर काही तरी खलबतं झाली असावी अशी चर्चा रंगली होती. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी पंतप्रधानांनीसोबत येण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले होते.