पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघर प्रकरण: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून पोलिस महासंचालकांना नोटीस

पालघर जिल्ह्यात जमावाने तिघांना जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

पालघर प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना नोटिस बजावली आहे. चार आठवड्यात पालघरमधील घटनेसंदर्भात स्पष्टीकर द्यावे, असे नोटिसीत म्हटलय.  चोर असल्याच्या अफवेतू प्रवास करणाऱ्या तिघांची जमावाने निर्घृण हत्या केली होती. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला होता. यात दोन साधूंसह एका चालकाचा समावेश होता. जमावाने तिघांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शिवडीत पार्किंगच्या वादातून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या

१६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात  दोन साधूंसह तिघांना जमावाने मारहाण केली होती. याप्रकरणात शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आले आहे. पालघर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आली होती.  राज्य सरकारने या प्रकरणाचा अहवाल तयार करुन सविस्तर माहिती द्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांप्रदायिक अफवा पसरवणाऱ्यावर सरकार नजर ठेवून आहे. हे प्रकरणाचे राजकारण होता कामा नये. कोणीही समाजात तेढ निर्माण करणारी माहिती पसरवू नका, असे राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

हृदयविकार, ६० वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील व्यक्तींना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नाही- आरोग्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याप्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली असून शहांनी देखील हे प्रकरण धार्मिकतेतून घडलेले नाही याला दुजोरा दिलाय, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली होती. पालघरमधी प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन समाजात गैरसमज पसरवू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:National Human Rights Commission of India NHRC sends notice to Maharashtra police chief in connection with lynching of 3 persons in Palghar