पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकमध्ये जवानाने केली पत्नीची हत्या

जवानाने केली पत्नीची हत्या

नाशिकमध्ये लष्कराच्या जवानाने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थनगरीमध्ये ही घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर जवानाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याचा जीव वाचला. म्हसरुळ पोलिसांनी जवानाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

 

'आप'चा सदस्य दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करा: केजरीवाल

सुनिल बावा असं जवानाचे नाव आहे. सुनिल १० दिवसांच्या सुट्टीवर आला होता. तो श्रीनगर येथे लष्करात तैनात होता. बुधवारी रात्री उशिरा सुनिल आणि त्याची पत्नी चैताली यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सुनिलने चैतालीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

भीमा-कोरेगाव: ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही!

दरम्यान, घटनेची माहिती कळताच म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सुनिलला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुनिलविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. सुनिल आणि चैताली यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. दोघांना एक लहान मुलगी आहे. या घटनेमुळे इंद्रप्रस्थनगरी परिसरात खळबळ उडाली आहे. 

दिल्ली हिंसाचार: मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर