पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पूर परिस्थिती

त्र्यंबकेश्वर पूर

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबक नगरी पाण्याखाली गेली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्र्यंबकेश्वरसोबतच नाशिकच्या इतर भागामध्ये देखील पावसाची संततधार सुरुच आहे. या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे आलेल्या पूरामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये पाणी साचले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे गावंच्या गावं जलमय झाली आहेत .

 

 

 

 

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसामुळे त्र्यबंकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये नदी प्रमाणे पाणी वाहत आहे. पावसाचा जोर वाढत चालल्यामुळे पाणी पातळी वाढतच चालली आहे. मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये देखील पाणी शिकले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे भाविकांची मोठी तारंबळ उडाली. या पावसामुळे त्र्यंबकेश्वरसोबतच नाशिक शहरामधील अनेक मंदिर पाण्याखाली गेली. त्याचसोबत पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे अनेक दुचाकी आणि कार पूरामध्ये अडकल्या. 

औरंगाबादमध्ये ४ इंग्लिश शाळांवर आयकर विभागाचे छापे

नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि पालखेड धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने नदी काठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

अयोध्या खटला : मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्याचे