पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नारायण राणेंचा भाजप प्रवेश युतीच्या वाटाघाटींवर अवलंबून, सूत्रांची माहिती

नारायण राणे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खासदार नारायण राणे भाजपमध्ये कधी प्रवेश करणार हा विषय उत्सुकतेचा बनला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दुपारी भाजपच्या पक्ष कार्यालयात एक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा काही माध्यमांमध्ये सुरू झाली होती. पण नारायण राणे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. हा पक्षप्रवेश नक्की कधी होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. 

शेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स १,३१३ अंकांनी वधारला

विधानसभा निवडणुकीसाठी सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीची चर्चा सुरू आहे. पण जागा वाटपाच्या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये युती संदर्भात एकमत झाल्याचे दिसत नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी युतीचे जागा वाटप जाहीर झालेले नाही. निवडणूक युतीनेच लढविणार असल्याचे दोन्ही पक्ष सांगत असले, तरी जागा वाटप नक्की कधी जाहीर होणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, मित्र पक्षांसाठी किती जागा सोडल्या जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा प्रवेश युतीमधील अंतर वाढविणारे ठरायला नको. म्हणूनच भाजपकडून या संदर्भात आस्ते कदम जाण्याचे ठरविण्यात आल्याचे दिसते. युतीची घोषणा कधी होते, भाजप आणि शिवसेनेमध्ये काय वाटाघाटी होतात, यावर नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अवलंबून आहे, असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजते.

थकीत पगार न दिल्याच्या रागातून खासगी शिकवणीच्या मालकाची हत्या

मला पक्षात घेण्यासाठी भाजपने पूर्ण तयारी केली होती. पण शिवसेनेने त्याला विरोध केला. तरीही मी लवकरच भाजपत सहभागी होणार असल्याचे नारायण राणे यांनी याआधीच पुण्यात जाहीर केले आहे. सर्व काही ठरले होते. मला कॅबिनेट दर्जाही देण्याचे निश्चित झाले होते. पण मला भाजपत घेतले गेले, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, अशी धमकी शिवसेनेने दिल्याचेही ते म्हणाले होते.