मंत्रिमंडळ विस्तार केला. पण अजून खातेवाटप नाही. दालनं वाटून घेतली, पण कारभार सुरु नाही. अशाने जनतेचे प्रश्न सुटत नाही. हे सरकार दोन महिने तर टिकेल की नाही, माहीत नाही, असा सवाल खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. जनतेचे प्रश्न सोडवण्याचा उद्धव ठाकरेंना अनुभव नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
माझ्यावर कंट्रोल 'मातोश्री'चा, तिथंच मी बोलणारः अब्दुल सत्तार
तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेले नारायण राणे हे 'एबीपी माझा'शी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यांनी राजीनामास्त्र काढले आहे. ही सुरुवात झाली आहे. येत्या काळात आणखी काही आमदार आणि मंत्री राजीनामे देतील.
अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरीही चढू देऊ नकाः चंद्रकांत खैरे
जनतेच्या आणि शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीच काम केलेले नाही. आर्थिक तरतूद न करता शेतकऱ्यांना हे सरकार पैसे कसे देणार. उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव नाही. त्यातच यांची विचारधारा वेगळी. शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादी तर काँग्रेस सर्वधर्म समभाव विचारधारेची. त्यामुळे ही आघाडी जास्त दिवस टिकणार नाही.
अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही, उद्या ठाकरेंना भेटणार
फडणवीस हे सत्यच बोलतात. हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. ही शिवसेनेची सत्ता नाही तर राष्ट्रवादीची आहे. उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तर ते जयंत पाटलांकडे हात करतात नाहीतर बाळासाहेब थोरांताकडे हात करतात. कॅबिनेट त्यांच्या घरातच आहे. जुन्या शिवसैनिकांना काहीच स्थान नाही, अशी टीकाही त्यांनी केली.