पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

प्रवीण दरेकर

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे भाजपचे सदस्य आहेत. विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत सुजितसिंह ठाकूर आणि भाई गिरकर हेही होते. पण दरेकर यांची भाजपने नियुक्ती केली. 

पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक, 'उद्धव ठाकरे होश मैं आओ'च्या घोषणा

दरेकर हे पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते आणि आमदार होते. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. मुंबई सहकारी बँकेचे ते अध्यक्षही आहेत. पक्षाची भूमिका माध्यमांसमोर आक्रमकरित्या मांडण्यासाठी ते ओळखले जातात.

आता आणखी एक राजकीय भूकंप होणार, रामदास आठवलेंचा

दरम्यान, भाजपने सुजितसिंह ठाकूर यांची मुख्य प्रतोदपदी तर उपनेतेपदी भाई गिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्मृतीदिन विशेष : मराठी सिने-नाट्यसृष्टीतील 'विनोदाचा बादशहा'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nagpur winter session pravin darekar appointed leader of opposition of legislative council vidhan parishad