पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पैसे आहेत, सरकारमध्ये निर्णय घेण्याची हिम्मत नाहीः गडकरी

नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. योजनांसाठी पैशांची कमतरता नाही. पण निर्णय घेण्याची जी हिम्मत हवी, ती सरकारमध्ये नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. योजनांवर काम न होण्यासाठी त्यांनी सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन जबाबदार असल्याची टीकाही केली.

नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मागील पाच वर्षांत १७ लाख कोटींची काम केल्याचे सांगितले. यावर्षी पाच लाख कोटींपर्यंत तो पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. 

अमर, अकबर, अँथनीचे सरकार जास्त टिकणार नाही: रावसाहेब दानवे

मी तुम्हाला खरे सांगतो, पैशांची कोणतीच कमतरता नाही. जे काही कमी आहे, ते सरकारमध्ये काम करणाऱ्या मानसिकतेत आहे. त्यांच्यातील नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत आहे, असे त्यांनी म्हटले.

सरकारमध्ये निर्णय घेण्यासाठी हिम्मत आवश्यक आहे. नेमकी त्याची कमतरता आहे. काही दिवसांपूर्वी एक उच्चस्तरीय बैठक होती. तिथे ते (आयएएस अधिकारी) म्हणत होते की, आम्ही हे सुरु करणार-ते सुरु करणार. तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही काय सुरु करणार? जर तुमच्यात सुरु करण्याची ताकद असली असती तर तुम्ही आयएएस अधिकार बनून येथे नोकरी का केली असती?

गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकण कड्यावरुन पडून मृत्यू