नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका दिला आहे. नागपूरमधील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या अनाधिकृत बंगल्यावर त्यांनी हातोडा चालवला आहे. आंबेकरचा बंगला पाडण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा बंगला पाडला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
'दहशतवादी घाबरलेत म्हणूनच बालाकोटनंतर मोठा हल्ला नाही'
यापूर्वी २०१९ मध्ये अतिक्रमणविरोधी पथकाने आंबेकरच्या पाचमजली बंगल्याचे दोन अनधिकृत मजले पाडले होते. इतवारीतील दारोडकर चौकात हा बंगला आहे. तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या कारवाईला प्रारंभ झाला आहे.
अहमदाबादमध्ये 'नमस्ते' आणि दिल्लीत आगडोंबः शिवसेना
आंबेकरने तीन प्लॉटला जोडून बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर यांच्या नावे होता. दुसरा प्लॉट अमरचंद मदनलाल मेहता यांच्या नावे तर तिसरा प्लॉट संतोष आंबेकरच्या स्वत:च्या नावावर होता. तिन्ही प्लॉटवर ८०३ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत होते.