पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरः पॉर्न व्हिडिओ दाखवत ४ वर्षांपासून सावत्र मुलीवर बलात्कार

पुण्यात चिमुरडीवर बलात्कार

नागपूर येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एक निर्दयी पिता गेल्या चार वर्षांपासून आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार करत असल्याची घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, नागपूर येथील जरीपटका परिसरातील एका ५३ वर्षीय व्यक्तीवर अल्पवयीन मुलीवर मागील ४ वर्षांपासून बलात्कार करत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

भारताचे मोठे पाऊल, हायड्रोक्सिक्लोरिक्विनवरील निर्यात बंदी हटवली

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित आरोपी आपल्या सावत्र मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखवत होता आणि घरातच तिच्यावर बलात्कार करत असत. पीडित मुलगी १७ वर्षांची असून मागील चार वर्षांपासून तिच्यावर हा प्रकार केला जात होता. 

चीन आला धावून, भारताला मदत म्हणून दिले पीपीई किट्स

अधिकारी म्हणाले की, पीडितेच्या आईला याबाबत समजल्यानंतर दोन वेळा तिने घर सोडले होते. परंतु, नंतर ती पुन्ही आरोपीकडे आली होती. पण, जेव्हा १ एप्रिलला आरोपीने पुन्हा एकदा मुलीवर बलात्कार केला. तेव्हा यावेळी आईने थेट पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. 

कोरोना क्वारंटाईन वॉर्डसजवळ पशू-पक्षी येऊ देऊ नका, अन्यथा...

संशयित आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Nagpur Man booked for allegedly raping minor step daughter in Nagpur over the last four years