पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूर महामेट्रो डेटा लीक प्रकरणात दोन जणांना अटक

नागपूर महामेट्रो

नागपूर महामेट्रोच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. डेटा लीक केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. महामेट्रो प्रशासनाने डेटा लीक प्रकरणी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. 

वकील इंदिरा जयसिंग, आनंद ग्रोव्हर यांच्यावर घरांवर सीबीआयचे छापे

नागपूर महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि महामेट्रो ऑपरेटर प्रविण समर्थ या दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्वाचा डेटा लीक केल्याचा या दोघांवर महामेट्रो प्रशासनाने आरोप केला आहे. बेवरा यांनी ऑपरेटर प्रविण समर्थच्या मदतीने डेटा लीक केला आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा दररोजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संदर्भातील डेटा त्यांनी लीक केला आहे. याप्रकरणी स्वत: महामेट्रो प्रशासनाने पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. 

खडकवासला धरण १०० टक्के भरले, विसर्ग सुरू

दरम्यान, याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा यांची काही दिवसांपूर्वी कामात कसूर केल्याप्रकरणी चौकशी देखील सुरु करण्यात आली होती. ही चौकशी सुरु असतानाच त्यांच्यावर आता डेटा लीक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित हे दररोज इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामाची दिशा ठरवून निर्देश देतात. बेवरा यांच्या सांगण्यावरुन प्रविण समर्थ याने ऑडिओ डेटा रेकॉर्ड करत त्यांना दिला होता. 

उत्तर प्रदेशात भाजप आमदाराच्या मुलीच्या व्हिडिओमुळे खळबळ

महामेट्रो प्रशासनाने याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. डेटा लिक प्रकरणी पोलिसांनी विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघांना देखील अटक करण्यात आली. महामेट्रोमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
... या क्षेत्रात २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकणार