पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ना. धों. महानोर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे होणार उद्घाटन

ना धों महानोर

जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने गेल्या पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. १० जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली. उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या सहवासामुळे साहित्यक्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले. 

..तर शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल, फडणवीसांचे वक्तव्य

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११, १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनाचे आयोजक मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरु आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे. साहित्य संमेलन अधिकाअधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

'नागरिकत्व कायदा लागू करण्यास नकार देण्याचा राज्यांना अधिकार नाही'

महानोर यांच्या लेखणीतून साकारलेली अजिंठा, कापूस खोडवा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पळसखेडची गाणी, पक्षांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता, यशवंतराव चव्हाण, रानातल्या कविता, शरद पवार आणि मी, शेती, आत्मनाश व संजीवन ही पुस्तके वाचकांचा मनाचा ठाव घेतात. 

जैत रे जै, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. ही गाणी मराठी रसिकजनांच्या ओठी आजही कायम आहेत.

नागरिकत्व कायद्याविरोधात जयराम रमेश सुप्रीम कोर्टात

ना. धों. महानोर यांना भारत सरकारकडून १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.  त्यांच्या पानझड या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार आणि २००९ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.