पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर: वाढदिवसादिवशीच ११ वीत शिकणाऱ्या तरुणीचा रहस्यमयी मृत्यू

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या तारळे गावात ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या तरुणीचा संशयतरित्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तारळे-दुर्गमांदवड रस्त्यावर असलेल्या मंदिरात तरुणीचा मृतदेह घंटेला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वाढदिवसाच्या दिवशी तरुणीची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. 

धक्कादायक! नागपूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  संबंधीत तरुणी वाढदिवस  साजरा करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत मंदिरात गेली होती. ती आत्महत्या करु शकत नाही, असे तिच्या कुटुंबियांनी म्हटले असून वाढदिवस साजरे करण्यासाठी तिच्यासोबत होते त्या मित्रांना ताब्यात घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांना अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करु देणार नाही, असे भूमिका देखील कुटुंबियांनी घेतली आहे. 

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन संपवले आयुष्य

देशातील विविध भागात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना महाराष्ट्रात आज नागपूरसह कोल्हापूरातही महिला सुरक्षिततेचा प्रश्न समोर येत आहे. नागपूरमध्ये आज ५ वर्षांच्या चिमरडीला दगडाने ठेचून मारण्याचा प्रकार उघडकीस आला होता.