हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे. तीच भारताची ओळख आहे. भारतातील मुसलमानांवर अन्याय केला जाणार नाही. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)मुसलमानांच्या विरोधात नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. नागपूर येथे सीएएच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मुसलमानांनी काँग्रेसचे षडयंत्र समजून घ्यावे. तुमचा विकास फक्त भाजप करु शकतो, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हिंदू असणे पाप आहे का असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Nitin Gadkari: #CAA is not against any Indian Muslim, it is only to grant citizenship to persecuted religious minorities of three neigbouring nations. I appeal to our Muslim brothers,see through this misinformation campaign of Congress, they only see you as a vote machine pic.twitter.com/L9zO8pHby7
— ANI (@ANI) December 22, 2019
अत्याचारग्रस्तांना भारत आधार देईल. काँग्रेसने परदेशी नागरिकांना 'रेड कार्पेट' टाकले. पाकिस्तानमधील हिंदूंची संख्या कमी का होत आहे, असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, नागरिकत्व कायदा हा मुसलमानांच्या विरोधात नाही. मुसलमानांना घाबरवले जात आहे. त्यांच्यात भीती निर्माण केली जात आहे. त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय फायद्यासाठी काँग्रेस मुसलमानांना घाबरवत आहे. त्यांच्या अपप्रचाराला फसू नका. तुम्ही मशिदीत जा, आमचा विरोध नाही. व्होट बँकेच्या राजकारणामुळेच काँग्रेसचा बँडबाजा वाजला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
CAA समर्थनात नागपूरमध्ये मोर्चा, महिलांचा मोठा सहभाग
मी १०१ टक्के चड्डीवाला- गडकरी
गडकरी पुढे म्हणाले की, मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा होतो. त्यावेळी मुसलमानांना मला मते द्यायची होती. त्यावेळी माझा चड्डीतला फोटो (आरएसएसचा गणवेश) व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांनी (मुसलमान) मला विचारले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मी एक-दोन टक्के नव्हे तर १०१ टक्के चड्डीवाला आहे. पण मी कधीच अस्पृश्यता केला नाही आणि करणारही नाही. जातीयवाद कधीच केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय फायद्यासाठी काँग्रेस मुसलमानांना घाबरवत आहे. त्यांचे षडयंत्र समजून घ्या. तुमचा विकास भाजपच करु शकेल, असे सांगत त्यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढणार असल्याचे स्पष्ट केले.
CAA:बुलेटप्रूफ जॅकेट नव्हे पाकिटातील नाण्यांमुळे पोलिसाचा वाचला जीव
तत्पू्र्वी, नागपुरातील यशवंत स्टेडिअम ते संविधान चौक सीएए कायद्याच्या समर्थनात मोर्चा काढला. यात मोठ्याप्रमाणात लोक सहभागी झाले होते.