पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'त्या' चिमुकलीला धनंजय मुंडे घेणार दत्तक, मुलीचं नाव ठेवलं 'शिवकन्या'

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

परळीतील रेल्वे रुळाजवळ  सापडलेल्या चिमुकलीला दत्तक घेण्याचा निर्णय परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री ८ च्या सुमारास रेल्वे रुळांजवळ काटेरी झुडुपात ही नवजात बालिका आढळली होती. 

नवी मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणीवर तिघांचा बलात्कार

 स्थानिकांना रात्री मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, शोधाशोध केल्यानंतर त्यांना काटेरी झुडपात ही  मुलगी आढळून आली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिला तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. तिची प्रकृती तेव्हा गंभीर होती, मात्र आता तिच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. धनंजय मुंडे यांना या नवजात बालिकेबद्दल कळताच त्यांनी तातडीनं मुलीच्या उपचारांची योग्य काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले. 

मराठी भाषा दिन विशेष : कारण I LOVE मराठी!

 या मुलीचे पालकत्त्व स्वीकारण्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी घेतला आहे. त्यांनी 'शिवकन्या'  असं तिचं नामाकरणही केलं आहे. 'मी त्या मुलीला  दत्तक घेणार आहे, परळीत परतल्यानंतर याचा निर्णय घेण्यात येईल. तिच्यावर उपचार सुरु आहेत रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर तिला पुण्यात आणण्यात येईल' अशी माहिती धनंजय मुंडे यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली.  मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत खासदार सुप्रिया सुळे देखील तिची सर्व जबाबादारी स्वीकारतील अशीही माहिती त्यांनी दिली.