पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरानाबाधितांचा आकडा थांबता थांबेना, राज्यात १४ जणांना लागण

आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई आणि ठाण्यामध्ये कोरोनाची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहे. या दोन रुग्णांसह राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता १४ वर पोहचला आहे. पुणे-मुंबई-नागपूर या शहरानंतर ठाण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे, अशी माहीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात पुण्यात सर्वाधिक ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अमेरिका रिटर्न पुणेकराला कोरोनाची लागण

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा दोनवरुन आता तीनवर पोहचला असून ठाण्यातही कोरोना विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. बुधवारी रात्री उशीराने नागपूरमध्ये रुग्णाचे रिपोर्टस हे पॉझिटिव्ह आले होते. राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढत आहे. राज्यातील पालक संघटनांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लिहिले आहे. राज्यात वेगाने कोरना विषाणूचे संक्रमण होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करा, अशी मागणी जोर धरत आहे.   

कोरोनामुळे अक्कीच्या बहुचर्चित 'सूर्यंवशी'ची प्रतिक्षा वाढली

यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. दोन दिवसांच्या आढाव्यानंतर यावर योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. नव्याने समोर आलेल्या केसेस पाहून उद्या शाळेसंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.