पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुण्यात १८ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

आरोग्य मंत्री राजेश टोपे

येत्या ४ मे रोजी देशव्यापी लॉकडाऊन संपल्यानंतरही राज्यातील पुणे-मुंबई शहरातील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरातील लॉकडाऊनचा कालावधी १८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात असून मुंबई आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सर्वाधिक आहे. कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या दोन्ही शहरातील निर्बंध  कायम ठेवावे लागू शकतात, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 

सिब्बल म्हणाले, मोदीजी CAA, NRC वाद विसरुन कोरोनाविरोधात एकत्र लढू

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. संक्रमणाचा वेग कायम असेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय अन्य कोणता पर्याय नसेल, असे राजेश टोपे यांनी मिंटला दूरध्वनीवरुन दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ३ मेनंतर फक्त मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागू  शकतो, असेही ते म्हणाले.

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीला परवानगी नाहीच, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

ते पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभांवर १८ मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ३ मेनंतर मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात कमीत कमी १५ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. २४ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ६ हजार ८१७ वर पोहचला आहे. यातील ४ हजार ४४७ केसेस या मुंबईतील असून 1,020 रुग्ण हे पुणे विभागात आढळले आहेत. मुंबईतील धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून या ठिकाणी वाढणाऱ्या आकड्यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर उभे राहिले आहे.