पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्या मुंबईसह कोकण पट्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईसह कोकण परिसरात जोरदार पावसाचे संकेत

राज्यात ठिकठिकाणी रविवारपासून वरुण राजाने लावलेल्या हजेरीनंतर मंगळवारी आर्थिक राजधानीत पाऊस धुवांधार बॅटिंग करणार असल्याचा दाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून मुंबई किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.  

हवामान खात्याच्या निरिक्षणानुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण-पूर्व आणि लक्षद्वीपजवळील काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून  येत्या ४८ तासांमध्ये त्याची व्याप्ती वाढणार आहे. परिणामी कोकण आणि मुंबई परिसरात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.  अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्याची वाढणारी व्याप्ती किनाऱ्यालगतच्या परिसरात पावसाची चाहूल देत आहेत.

स्कायमेट या खासगी संस्थेनेही अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचे म्हटले असून ११ आणि १२ या दोन दिवसांत मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.