पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९: पाच शहरात ९१ टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात ९ टक्के रुग्ण

आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा थांबतानाचे चित्र दिसत नाही.  ट्रेसिंग टेस्टिंग आणि ट्रिटमेंटच्या प्रक्रिया सुरु असून चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही राज्यातील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील आकडा हा सर्वाधिक असला तरी जवळपास ७०रुग्णांमध्ये सौम्य लक्षण आढळली आहेत. २५ टक्के रुग्ण मध्यम स्वरुपाची लक्षणं असून केवळ 5 टक्के रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती  राजेश टोपे यांनी दिली.

तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो, ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम!

राजेश टोपे म्हणाले की, मुंबई, पुणे, ठाणे पालघर परिसरात ९१ टक्के रुग्ण आढळले आहेत. यातील मुंबईत ६१  टक्के पुण्यात २० टक्के आणि पालघर, ठाणे येथील १० टक्के रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित इतर राज्यात ९ टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील वाढता आकड्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. रुग्णालयामध्ये तीन स्तरावर कक्ष तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार उपचार केले जातील असेही, त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील आकडा हा सर्वाधिक असला तरी सर्वाधिक टेस्ट करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. यावेळी त्यांनी आरोग्य सेतू एप वापरण्याचा सल्लाही राज्यातील जनतेला दिला. कोरोनाग्रस्तांच्या केसेस नुसार, जिल्हानिहाय ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन तयार करण्यात येणार आहे, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

...तर देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ लाखांच्या घरात असता : लव अग्रवाल

 राज्यात मागील २४ तासांत नव्या १८७ रुग्णांसह राज्यातील आकडा हा १ हजार ७६१ वर पोहचला आहे. मुंबईत राज्यातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील धारावीत नव्याने रुग्ण आढळल्याने प्रशासनासमोरी आव्हान आणखी वाढले आहे. प्रशासनाकडून आता घराघरापर्यंत जाऊन कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, तपासण्याचे काम सुरु आहे. या लढ्यात जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे आवाहन पुन्हा एकदा आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mumbai 61 pune 20 and thane Palghar 10 and other Satate 9 percentage covid 19 patients in maharashtara