पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : MPSC Exam पुढे ढकलणार, राज्य सरकारची अयोगाकडे विनंती

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शाळा महाविद्याल बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यांचे संकेत दिले आहेत. कोरोना विषाणूचे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षा ३० मार्चनंतर घ्यावी अशी विनंती, अयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसेवा अयोग ही स्वायत्व संस्था आहे. त्यांच्या निर्णयामध्ये राज्य सरकार कोणाताही हस्तक्षेप करु शकत नाही. पण सरकारने त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. 

२८९ प्रवाशांना दुबईला घेऊन जात असलेल्या विमानात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात एकुण ३२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात ९ जणांवर उपचार सुरु आहेत. बाह्य रुग्ण विभागाच्या दैनंदिनी जवळपास ३५० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SAARC मधील राष्ट्रांना मोदींनी दिला मंत्र

दोन दिवसांमध्ये केईएम कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक मशिन उपलब्ध करुन देण्यात येतील. मुंबई पुण्याशिवाय राज्यातील धुळे, औरंगाबाद, मिरज आणि सोलापूरमध्येही उपचारासंदर्भात कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली आहे. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये आवश्यक त्या सर्व सोई उपलब्ध असून क्षमता वाढवण्यावर राज्य सरकार भर देत असल्याचे ते म्हणाले.