पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जुन्या मित्रांच्या चांगल्या गोष्टींवर घाव घालणार नाही : CM ठाकरे

जयंत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (pc जयंत पाटील यांच्या फेसबूक पेज)

जे जे चांगले आहे ते वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे. पहिल्या सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्या उगाच स्थगिती देणार नाही. तसेच वाईट गोष्टींना थारा देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाळवा मतदार संघातील इस्लामपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. सरकार येते सरकार जाते मात्र राज्यातील जनता आणि शेतकरी महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही ते म्हणाले. 

बेपत्ता 'डॉ. बॉम्ब'ला कानपूरमधून अटक

शहरी आणि ग्रामीण लोकांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळायला हवा, असे म्हटले आहे.  ज्या प्रमाणे ग्रामीण भागातील लोक काम करतात त्याप्रमाणे शहरी लोकही काम करतात. पण शेतकरी हा उन्ह वारा पाऊस न पाहाता विना सुट्टी काम करत असतो. त्यांच्या मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. तुम्ही मला ती संधी दिली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  दुष्काळानंतर बऱ्याचदा जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या आहारासोबत आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरते पशू चिकित्सालय सुरु करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.  

निर्भया बलात्कार प्रकरणः नवीन डेथ वॉरंट जारी, १ फेब्रुवारीला फाशी

दिवंगत नेते राजाराम बापू यांच्या समाज कार्याचेही मुख्यमंत्र्यांनी तोंडभरुन कौतुक केले. राजाराम बापू हे व्यक्तिमत्व राजकारणापूरते मर्यादीत नव्हते. ते समाजकारणाचे एक विद्यापीठ होते, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जयंतराव आणि आम्ही एका शाळेत होतो. आम्ही आता एकमेकांना ओळखत नाही, अशी आठवणही त्यांनी या कार्यक्रमात सांगितली.