पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरात माळीण होण्याची भिती; डोंगराला पडल्या भेगा

कोल्हापूरात डोंगराला पडल्या भेगा

कोल्हापूरला आधी पावसाने झोडपले. त्यानंतर पूराने थैमान घातले. गावंच्या गावं पाण्याखाली गेली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. आता हळूहळू पूर ओसरतोय तरी देखील कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील चार गावं भितीच्या छायेखाली आहेत. कारण आजरा तालुक्यात दुसरं माळीण होण्याची शक्यता आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

आजरा-भुदरगड सीमेवरील शिवारबा डोंगराला जवळपास पाच किलोमीटरपर्यंत मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. सकाळी मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आजरा तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडी, पेरणोली, नावलकरवाडी आणि धनगरवाडा ही चार गावात भितीच्या छायेखाली आहेत. दरम्यान, प्रशासनाकडे तक्रार करुन देखील कोणीही अधिकारी तसंच कर्मचारी घटनास्थळी पोहचले नाही.

विरारमधील रिक्षाचालकाला आदित्य ठाकरेंकडून एक लाख  

दरम्यान, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूराने कोल्हापूर शहरासह गावांना विळखा घातला होता. या पूरामुळे कोल्हापूरचे मोठे नुकसान झाले आहे. पूरामध्ये अनेकांचे बळी गेले, तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले. दरम्यान, आता पूर ओसरु लागला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारसह अनेक सामजिक संस्था, सेलिब्रिटी कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. 

काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक