पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईसह मुलाचा बुडून मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

अहमदनगर शहरात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेलेल्या आईचा मुलासह बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सांयकाळी मुळा धरमावरील चमोरी गेस्टहाऊससमोर घडली. विशेष म्हणजे या महिलेने आपल्या बुडणाऱ्या पतीला वाचवले होते. पण मुलाला वाचवायला गेल्यानंतर दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. 

VIDEO: महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या आणि अंडी

नगर शहरातील बोरूडे मळा येथील सातपुते कुटुंब शेजारच्या कुटुंबाबरोबर मुळा धरण पाहण्यासाठी गेले होते. गणेश सातपुते (४३), पूजा गणेश सातपुते (३७) व मुलगा ओंकार (१३) चमोरी गेस्टहाऊससमोर जलाशयाजवळ उभे होते. अचानक मुलगा ओंकारचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. मुलगा पडल्याचे दिसताच गणेश यांनी पाण्यात उडी टाकली. मात्र, या बाप-लेकाला पोहता येत नसल्याने दोघेही बुडू लागले. 

पती व मुलगा बुडत असल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न करता पूजा यांनी धाडसाने पुढे जात पतीला हात दिला. त्यामुळे त्यांचा प्राण वाचला. पण मुलगा ओंकारला वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पाण्याची खोली जास्त असल्याने मायलेक बुडाले. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुकड्यांवर जगणारी आमची औलाद नाहीः शिवेंद्रराजे