पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलढाण्यात पाय आणि तोंड बांधलेले ६० मृत श्वान आढळल्याने खळबळ

बुलढाण्यात पाय आणि तोंड बांधलेले ६० मृत श्वान आढळल्याने खळबळ (ANI)

बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाय आणि तोंड बांधलेले सुमारे ६० हून अधिक श्वान मृतावस्थेत आढळले. हा प्रकार बुलढाण्यातील गिरडा-सावलदबारा रस्त्याच्या कडेला घडला. रविवारी घटनेची माहिती मिळताच वन विभागाने सर्व मृत श्वानांचा ताबा घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेतील १०० श्वान जिल्ह्यातील विविध भागात आढळून आले आहेत. त्यातील ६० हून अधिक श्वान हे मृत आहेत. 

किल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्याः राज ठाकरे

वन विभागाचे के एन तराळ या अधिकाऱ्याने सांगितले की, गिरडा-सावलदाबारा रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी या मृत श्वान विखुरले गेले होते. प्रत्येक श्वानाचे पाय आणि तोंड बांधले होते. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यावेळी ही घटना समोर आली. गावातील पोलिस पाटलाने याबाबत त्वरीत वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जिवंत असलेल्या काही श्वानांना त्वरीत मुक्त केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:More than 60 dogs were found dead with their legs tied with strings in the forest of Girda in Buldhana