पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येत्या शुक्रवारी मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता

पाऊस (प्रातिनिधिक छायाचित्र)

येत्या शुक्रवारी, २१ जून रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सोमवारी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या आतुरतेने मान्सूनची वाट पाहात आहेत. दरवेळी ७ जूनला महाराष्ट्रात प्रवेश करणारा मान्सून यावेळी वेगवेगळ्या कारणांमुळे लांबणीवर पडला आहे.

हवामान विभागाने येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात पोहचलेला असेल आणि तो सक्रीय झालेला असेल, असे म्हटले आहे. वायू चक्रीवादळाचाही यंदा मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती मंदावली होती. हे चक्रीवादळ गुजरातला धडकणार अशी सुरुवातीला शक्यता होती. पण त्याने मार्ग बदलला होता. आता या वादळाची तीव्रता कमी झालेली आहे आणि ते गुजरातपासून सुमारे २४० किलोमीटरवर अरबी समुद्रात स्थिरावले आहे.

'वायू'मुळे मान्सूनचा वेग मंदावला, केरळ आणि तामिळनाडूतच मुक्काम

मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर ८ जूनला आगमन झाले होते. केरळमध्येही मान्सूनचे यावेळी एक आठवडा उशीराने आगमन झाले होते.