पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर पावसाळा संपला, राज्यात सरासरीपेक्षा जास्त तर पुण्यात रेकॉर्डब्रेक पाऊस!

मुंबईतील पाऊस

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तुफान बरसल्यानंतर आणि काही भागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमीच पडल्यानंतर अखेर यंदाचा पावसाळ्याचा मौसम सोमवारी, ३० सप्टेंबरला संपला. महाराष्ट्रामध्ये यंदा सरासरीच्या ३२ टक्के जास्त पाऊस पडला. यंदा गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा भारतीय हवामान विभागाने मान्सूनची माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्यापासूनचा म्हणजेच १९०१ पासूनचा चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे.

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

महाराष्ट्रात सरासरीच्या सर्वात जास्त पाऊस १९८८ मध्ये पडला होता. त्यावेळी सरासरीच्या ३७.६ टक्के इतका जास्त पाऊस पडला होता. मुंबईमध्ये यंदा मान्सूनचे आगमन होण्यास १५ दिवसांचा उशीर झाला. तरीही मुंबईत यावर्षी सरासरीपेक्षा जास्तच पाऊस बसरला आहे. एक जून ते ३० सप्टेंबर या काळात मुंबईत सांताक्रुझ वेधशाळेच्या कक्षेत सरासरीच्या ६६ टक्के जास्त पाऊस पडला. तर कुलाबा वेधशाळेच्या कक्षेत दक्षिण मुंबईमध्ये सरासरीच्या ३५ टक्के जास्त पाऊस पडला. 

पुण्यातमध्ये सरासरीच्या १०९ टक्के जास्त पाऊस यंदाच्या वर्षी पडला आहे. पुण्यात पावसाळ्यात सरासरी ८६१ मिमी पाऊस पडतो. पण यंदाच्यावर्षी १८०३.५ मिमी इतका पाऊस पडला आहे. या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ५५ टक्के, विदर्भात १२ टक्के आणि कोकणात ३२ टक्के इतका जास्त पाऊस पडला. महाराष्ट्रात केवळ मराठवाड्यात सरासरीच्या १२ टक्के कमी पाऊस पडला आहे. 

विधानसभा निवडणूक : राज्यात सोमवारी १०१ उमेदवारी अर्ज दाखल

पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एल निनोचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि पावसासाठी पोषक परिस्थिती भारतीय उपखंडात निर्माण झाल्यामुळे यंदा अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, असे पुण्यातील वेधशाळेतील हवामान संशोधन विभागाचे प्रमुख डी एस पै यांनी सांगितले.