पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर मान्सूनचे कोकणात आगमन, दोन दिवसात राज्यात सक्रीय

मान्सून (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सूनने राज्यातील काही भागात आपली उपस्थिती लावली आहे. दक्षिण कोकणात मान्सूनने आगमन केले आहे. मान्सूनने रत्नागिरी-कोल्हापूरपर्यंत हजेरी लावली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. शनिवारी सुर्याचा आर्दा नक्षत्रात प्रवेश होत असून वाहन हत्ती असल्याने मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

धरणे कोरडी पडण्याच्या दिशेने, पुणेकरांवर चिंतेचे ढग

दरम्यान, मागील २४ तासांत सिंधुदुर्गमध्ये २४३ मिमी पाऊस पडला आहे. सांगोला, माणमध्ये मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातले बांध फुटल्याच्या घटना घडल्या. शनिवारपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

Style Tips : पावसाळ्यातही बिंधास्त करा स्टाईलिस्ट गेटअप

वायू वादळानंतर झालेल्या बदलामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर लागणार असल्याचे वृत्त होते. राज्यातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून ग्रामीण भागासह शहरी भागातही पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सर्वचजण चातकासारखी वाट पाहत आहेत.

कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढलीः फडणवीस