पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसाच्या थैमानामुळे अनेक एक्सप्रेस रद्द!

रेल्वे सेवा कोलमडली

मुसळधार पावसानंतर मुंबई, उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईतील उपनगरीय वाहतूकीसोबतच  रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे मुबई-पुणे रेल्वे वाहतूकीसर नाशिक- मुंबई रेल्वे वाहतूकर परिणाम झाला असून या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद आहे. अनेक ठिकाणी लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. कोणक रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. 

रद्द करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या: 
- मुंबई - सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस 
- मुंबई- चेन्नई मेल 
- मुंबई - भूसावळ पॅसेंजर 
-मुंबई- कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 
 - मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस 
- मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस 
- मुंबई-शिर्डी साईनगर एक्सप्रेस 
- मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस
- पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस 
- पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 
 - भूसावळ-पुणे एक्सप्रेस 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:monsoon 2019 many express trains cancelled due to heavy rain in mumbai thane and other places in maharashtra