पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघरमध्ये चोरांच्या अफवेतून तिघांची निर्घृण हत्या

डोंबिवली हत्या प्रकरण

पालघरमध्ये चोर समजून तीन जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या गडचिंचले येथे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. गडचिंचले गावात चोर घुसल्याची अफवा परसली होती. या अफवेतून गावकऱ्यांनी इको गाडीने जात असलेल्या तीन जणांना पकडून  बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघांची मृत्यू झाला आहे. 

कोरोना लक्षणाची खात्री करण्यासाठी राज्यात कोविड हेल्पलाईन सुरू

गुरुवारी रात्री गडचिंचले येथे चोर आल्याची अफवा पसरली होती या अफवेनंतर ग्रामस्थांनी दाभाली-खानवेल मार्गावरुन जाणाऱ्या इको कारला अडवले. या कारमध्ये बसलेल्या तिघांची त्यांनी विचारपूस केली. त्यांनी काही सांगायच्या आत ग्रामस्थांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तर इतर ग्रामस्थांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून त्यांना लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

दिलासादायक, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत मोठी वाढ

घटनेची माहिती कळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र नागरिकांनी पोलिसांचे ऐकले नाही. उलटं त्यांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी तिघांची लाठ्या, काठ्या आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी कासा पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला. तिघेही जण कांदिवली येथून सुरत येथे मित्राच्या अंत्यविधीसाठी जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी काही क्षेत्रांना लॉकडाऊनमधून वगळले, वाचा यादी