पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती द्या, ५००० रुपये मिळवा- मनसे

(छाया सौजन्य : ANI)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती देणाऱ्यांना ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी मनसेचे पोस्टर  लावण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी  राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कात टाकत हिंदुत्त्वाचा नारा दिला. बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते.

कोणते गुन्हे मागे घेतले?, प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला सवाल

त्यामुळे मनसे राज्यात आलेल्या घुसखोरांबद्दल अधिक आक्रमक झाली आहे. मुंबई पाठोपाठात मनसेनं औरंगाबादमध्येही 'घुसखोर हटाओ! देश बचाओ'चा नारा दिला आहे. 'बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती देणाऱ्यांना मनसे औंरगाबादकडून ५००० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल',  अशा स्वरुपाची पोस्टरबाजी शहरात पाहायला मिळत आहे. 

पालिकेच्या शाळेत १४ विद्यार्थिनींचा संगणक प्रशिक्षकाकडून विनयभंग

या महिन्यांच्या सुरुवातीला मुंबईत बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेनं मोर्चाही काढला होता.  यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पनवेलमध्ये पोस्टरबाजीच्या माध्यमातून मनसेने बांगलादेशी घुसखोरांना इशारा दिला होता. आता अशाच प्रकारचे पोस्टर  औरंगाबादमध्येही पाहायला मिळत आहेत. 

'सारे मोदी चोर' विधानासंदर्भातील खटल्यात राहुल गांधींना दिलासा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:MNS Poster stating to reward with Rs 5000 the informers who give accurate information about illegal Pakistani and Bangladeshi infiltrators