पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा; विनोद पाटलांची CMकडे तक्रार

विनोद पाटील

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचे गुरुवारी  पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात अनावरण करण्यात आले. हा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. मनसेच्या नव्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर शिवमुद्रा आहे. दरम्यान, मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा वापर करुन नये अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. विरोध करुन सुध्दा मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्यामुळे अत्यंत दु:ख झाले असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे वकील विनोद पाटील यांनी दिली. 

सत्तेत बसलेली लोकं खरी 'तुकडे-तुकडे गँग': पी. चिदंबरम

मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केला. हे योग्य नाही. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तसंच, निवडणूक आयोगाकडे सुध्दा तक्रार केली आहे. न्याय न मिळाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असे विनोद पाटील यांनी सांगितले. मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुठे तरी मर्यादीत राहतील अशी भिती आम्हाला वाटत असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. 

अमित ठाकरे सक्रीय राजकारणात, मनसेच्या नेतेपदी निवड

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना समान न्याय मिळवून दिला. मात्र आज त्यांच्या राजमुद्रेच्या नावाखाली मत मागितली जातील याची भिती वाटत आहे. छत्रपतींकडून कायम सर्वांना प्रेरणा मिळाली आहे. उद्या निवडणूक अधिकारी हे झेंडे काढतील. कचऱ्याच्या पेटीत टाकतील. वादविवाद होतील, असे देखील त्यांनी सांगितले. याची खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे. आम्ही राज्य सरकारला कायद्याच्या चौकटीतून मागणी केली आहे, असे विनोद पाटील यांनी सांगितले.  

अझरुद्दिन विरोधात २० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप