पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही, मनसेने झेंड्यापेक्षा मन बदलावे'

रामदास आठवले, राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचे गुरुवारी पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात अनावरण करण्यात आले. मनसेच्या या नव्या झेंड्यावर रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार टीका केली आहे. मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

सरकारच्या जाहिरातींमध्ये PM मोदींचे छायाचित्र ठेवा: देवेंद्र फडणवीस

मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. दरम्यान, रामदास आठवले यांनी भाजपला मनसेबरोबर युती न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

'राज'गर्जनेची उत्सुकता! थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात होणार

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही त्यांनी केली. आम्ही भाजपबरोबर आहोत, पण राज्यातलं तीन पक्षाचं सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असून आता सरकारमध्ये किती काळ राह्यचं हे या तिन्ही पक्षांनाच ठरवावे लागणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितले. 

मनसे झेंडा वाद: संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरेंविरोधात तक्रार