पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

हर्षवर्धन जाधव

मनसेचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नितीन रतन दाभाडे (वय ३० रा. बनेवाडी) या पानटपरी चालकाने जाधव यांच्याविरोधात दि. २९ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दाभाडे यांची  क्रांतीनगर सिग्नलजवळ पान टपरी आहे. त्या टपरीवर त्यांनी निळा झेंडा लावला होता. जाधव यांनी दाभाडे यांना ही पान टपरी काढण्यास सांगितले. जाधव यांनी आपल्या जीवे मारण्याची धमकी दिली तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचे दाभाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरुन जाधव यांच्याविरोधात अॅट्रासिटी अॅक्ट आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्या रिकाम्या प्लॉटसमोर ही पानटपरी असल्याचे सांगण्यात येते. त्यावरुनच वाद झाल्याचे बोलले जाते.

दिल्ली हिंसाचाराचे ४६ बळी, नाल्यात मिळाले आणखी ४ मृतदेह

काही दिवसांपूर्वीच जाधव यांनी पुन्हा एकदा मनसेत प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना मनसेचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. या प्रकारामुळे जाधव यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'देश के गद्दारों को' घोषणा देणाऱ्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक