पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' जाहीर, पाहा यादी

'प्रतिरुप मंत्री मंडळा'ची यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनादिवशी मनसेकडून 'शॅडो कॅबिनेट' म्हणजे 'प्रतिरुप मंत्री मंडळा'ची यादी जाहीर केली आहे. ''वाभाडे काढण्यासाठी मंत्री मंडमंडळाची स्थापना करण्यात आली'', असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी ठरवेल राज्यसभेसाठी चौथा उमेदवारः काँग्रेस

''या सरकारवर अकुंश  राहावा, सरकारला समज यावी यासाठी मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली आहे'' असंही  राज ठाकरे यांनी सांगितलं. ''या मंत्रीमंडळात मनसेच्या साऱ्या विश्वासू पदाधिकारी आणि नेत्यांचा समावेश  आहे, पण जर कोणाला काम करण्याची इच्छा आहे मात्र ती व्यक्ती राजकारणात किंवा पक्षात नाही तर तिनं येऊन माझी भेट घ्यावी त्या व्यक्तीचा समावेश नक्कीच मंत्रीमंडळात करण्यात येईल'' असं सांगत राज ठाकरे यांनी जनतेला आश्वस्त केलं.

मंत्रालयात पाच दिवसांचा आठवडा आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांना ७ दिवस काम

 'प्रतिरुप मंत्री मंडळा'ची यादी  पुढीलप्रमाणे 
गृह, विधी, न्याय, जलसंपदा - बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, प्रविण कदम 
महिला बालविकास- शालिनी ठाकरे
जलसंपदा-  अनिल शिदोरे
पर्यटन - अमित ठाकरे 
मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान,  - अमित ठाकरे, अनिल शिदोरे, अजिंक्य चोपडे
उर्जा - शिरिष सावंत, मंदार हबळे, विनय भोईल 
शालेय उच्च शिक्षण - अभिजित पानसे, आदित्य शिरोडकर 
वित्त, गृह - नितिन सरदेसाई, अनिल शिरोदे
नगरविकास पर्यटन - संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर,
कामगार - गजानन राणे, राजेंग्र वागस्कर
पर्यावरण - रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे 
महसूल परिवहन - अविनाश अभ्यंकर, दिलिप कदम, कुणाल माईनकर 
ग्रामविकास खातं - सुरेश शिंदे
सांस्कृतिक कार्य- अमेय खोपकर
अन्न व नागरीपुरवठा- राजा चौघुले, महेश जाधव
कुटुंब कल्याण- रिटा गुप्ता 
मदत पुनर्वसन,  वने- संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी,