पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा : राज ठाकरे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा

राज ठाकरे

सगळा देश आज कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लढा देतो आहे. लॉकडाऊनमुळे घरात थांबूनच विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्याचे काम केले जात आहे. असे असताना राजकीय पक्ष, संघटनांकडून समाजातील गरिबांना, रोजंदारीवर काम करणाऱ्यांना, हातावर पोट असणाऱ्यांना या कठीण प्रसंगात विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. पण अशी वाटप करताना संबंधित व्यक्तीचे फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे कितपत योग्य आहे, असा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी उपस्थित केला. मनसैनिकांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये त्यांनी हा मुद्दा नेमकेपणाने मांडला आहे.

रेल्वे, हवाई वाहतूक ३ मे पर्यंत बंद राहणार

राज ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, आपण ज्याला मदत करतो आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही का? मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असते पण आज प्रसंग बाका आहे. त्यामुळेच तो नाईलाजाने मदत स्वीकारत आहे, अशा वेळी त्याची छायाचित्र काढून त्याची मान शरमेने खाली घालणे कितपत योग्य आहे? तसेच मदतकर्त्याने देखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हे देखील योग्य आहे का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

नरेंद्र मोदींच्या भाषणानंतरचे ५ महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे

राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये मनसैनिकांना महत्त्वाची सूचनाही केली आहे. यापुढे मदतकार्याची कोणतीही छायाचित्रे यापुढे पक्षाच्या मेलवर पाठविणार असाल तर ती केवळ मदतीच्या साहित्याची, संपर्कस्थळाची, मदतीच्या प्रमाणाची असतील, हे बघावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी या कठीण प्रसंगात मदतकार्य उत्तमपणे सुरूच ठेवावे. मदतकर्त्यांनी स्वतःचीही काळजी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.