पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहा रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस, अमेय खोपकरांची मार्मिक टीका

जितेंद्र आव्हाड शिवभोजन थाळीतील पदार्थ खाताना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिवभोजन थाळीचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रविवारी झाला. पण या थाळीचा शुभारंभानिमित्तच्या एका फोटोमुळे राज्यातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी टीका केली.

एअर इंडियाचे खासगीकरण, आता सर्व हिस्सा विकण्याची सरकारची तयारी

अत्यंत मार्मिक शब्दांत अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. जितेंद्र आव्हाड यांचा एक फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करत त्यासोबत त्यांनी म्हटले आहे की, १० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस! 

जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोमध्ये ते शिवभोजन थाळीतील पदार्थ खाताना दिसतात. पण त्यांच्या ताटाशेजारी एक पाण्याची बाटली दिसते. याच पाण्याच्या बाटलीवरून अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. वास्तविक शिवभोजन थाळी ही गरिबांसाठी सुरू करण्यात आली आहे. गरिबांना स्वस्तात चांगले जेवण घेता यावे, असा या थाळीचा उद्देश आहे. राज्य सरकारने त्यासाठी निर्देशही जारी केले आहेत. असे असताना जितेंद्र आव्हाड यांनी ही थाळी घेऊन जेवण केल्याचा फोटो समोर आल्याने सोशल मीडियावर काही जणांनी त्यांच्यावर टीका केली.

सात क्षेत्रांत साडेतीन कोटी लोक बेरोजगार, प्रियांका गांधींचा हल्ला

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये १० रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर २६ जानेवारीपासून काही निवडक ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.