पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...

इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देऊन येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने ३०० खाटांच्या कोरोना रुग्णालयात रुपांतर केले आहे. यात पंधरा आय.सी.यू. बेड, सिटी स्कॅन एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसात तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

लवकरच पाच मिनिटांत कोरोनाचा अहवाल देणारे टेस्ट किट, १०० रुपयांत चाचणी

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल येईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

गर्भवती महिलेला पतीसह उपाशीपोटी नाइलाजनं करावी लागली पायपीट

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:miraj government medical college converted to corona hospital says minister amit deshmukh coronavirus covid 19