पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! नागपूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या, शेतात सापडला मृतदेह

नागपूरमध्ये पाच वर्षांच्या मुलीची हत्या

नागपूरच्या कळमेश्वरमध्ये अवघ्या ५ वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण शहर हादरुन गेले आहे. या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून डॉक्टरांच्या अहवालानंतर याबाबत सविस्तर माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.  
हैदराबाद एन्काऊंटर: हुज्जत घालणाऱ्या महिला पत्रकाराला सायनाने सुनावले

कळमेश्वर पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, चिमकलीचे आई-वडील शेत मजूरी करतात. शुक्रवार ६ डिसेंबर  दुपारपासून ही चिमुकली बेपत्ता होती. शनिवारी लिंगा गावातील शेतात तिचा मृतदेह आढळला. मुलीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. डोके दगडाने ठेचण्यात आले होते. याप्रकणात कलम ३०२ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दिल्लीत ४ मजली इमारतीला भीषण आग, ४३ जणांचा मृत्यू

मृत मुलीचे आई-वडील शेत मजुरीचं काम करतात. ज्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला त्या शेताच्या दुसऱ्या बाजूला मुलीचे आजी-आजोबा राहतात. मुलगी त्यांच्याकडेच गेली असावी, त्यामुळे शुक्रवारी आई-वडिलांनी तिची शोधाशोध केली नाही. मात्र ती आजी-आजोबांसोबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रविवारी शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला.